चिखलदरा: विश्राम गृह येथे युवा स्वाभिमान पार्टीची आढावा बैठक संपन्न;चिखलदरा तालुक्याची नवी कार्यकारिणी जाहीर
चिखलदरा येथील शासकीय विश्राम गृह येथे आज दुपारी ३ वाजता युवा स्वाभिमान पार्टीची आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष उपेन बचले तर प्रमुख उपस्थितीत राम हेकडे होते.बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांबाबत चर्चा करून तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत पदाधिकारी शहर अध्यक्ष आनंद गौर, जामली सर्कल अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.