धुळे: 17 सप्टेंबरपासून 'स्वच्छता ही सेवा'पंधरवडा
मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांची माहिती
Dhule, Dhule | Sep 15, 2025 ग्रामस्थांना सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन धुळे -स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा 2025 पंधरवडा' दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 'स्वच्छोत्सव' या थीमखाली साजरा करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबविला जाणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट तसेच विविध विभागांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन 15 सप्टेंबर सोमवा