पालघर: शेतीशी निगडीत साहित्य व वस्तूंच्या किमती जीएसटी सुधारणांमुळे कमी होणार- भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये
केंद्र सरकारमार्फत जीएसटी सुधारणा लागू करण्यात येणार असून यामुळे शेती साहित्य, ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, बायो पेस्टिसाइड्स यांवरील कर कमी होणार आहे. त्यामुळे शेतीशी निगडित साहित्य व वस्तूंच्या किमती जीएसटी सुधारणांमुळे कमी होणार असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नालासोपारा येथे पत्रकार परिषदेत सांगितले आहे.