पालघर: कपासे ठाकूर पाडा येथे आदिवासी संस्कृतीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम
पालघर तालुक्यातील सफाले पश्चिमेला असलेल्या कपासे ठाकूर पाडा येथे आदिवासी संस्कृतीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आसाम, राजस्थान राज्यातील तसेच जळगाव, धुळे ,नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यातील वेगळा तालुक्यातून मोठ्या संख्येने मान्यवर कलाकार उपस्थित होते. त्या कार्यक्रमाला भव्य तारपा प्रतिकृती व आदिवासी देव देवता संस्कृत दर्शन घेण्यात आले होते तसेच आदिवासी संस्कृती दर्शन बोलीभाषा नृत्य आधीचे सादरीकरण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.