महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथील सागर भाऊराव राखोंडे वय ३६ वर्षे या युवकाने आज दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी ४ वाजताच्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याना सदर युवकांने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसल्याने सदर घटना उघडकीस आली आहे. सदर घटणेची माहीती तलाठी व महागांव पोलीस स्टेशनला दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. सागर हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. त्यांच्या मृत्युचे कारण समजले नसुन पुढील तपास पोलीस करत आहे.