फलटण: फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर पोक्सोचा गुन्हा दाखल
Phaltan, Satara | Sep 10, 2025 फलटण तालुक्यातील फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावाच्या शेतात दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता १६ वर्ष ८ महिन्याची मुलगी शेळ्या चारत होती. तेव्हा त्याच गावातील एक तरुण दुचाकीवरुन तिच्या जवळ आला. तिला म्हणला तुला बऱ्याच दिवसांपासून बघतोय आज सोडणार नाही, असे म्हणत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.