जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, भुसावळ नगरपरिषदेची पहिली सभा शुक्रवारी १९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता पार पडली. मात्र, सभेच्या सुरुवातीपासूनच राजकीय तणाव पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि गटनेते सचिन चौधरी यांनी विविध तांत्रिक मुद्द्यांवरून आक्षेप घेत आपल्या समर्थकांसह सभात्याग केला.