राधानगरी: माणगांवमध्ये ८२ लाख रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते संपन्न
माणगांव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार शिवाजीराव पाटील व माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता उत्साहात पार पडले.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हे पाऊल महत्त्वाचे असून,शाश्वत विकासाची सुरुवात आता झाली आहे,असे आमदार शिवाजीराव पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.