अमरावती: पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुबाडणारी कुख्यात इराणी टोळी अमरावतीत गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, पो
अमरावती ग्रामीणसह लगतच्या जिल्ह्यांत पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना थांबवून दागिने लुबाडणाऱ्या कुख्यात इराणी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. तळेगाव, वरुड, मोर्शी, तिवसा, परतवाडा या हद्दीत वृद्ध नागरिकांना फसवून सोन्याचे दागिने लुबाडले जात होते. तळेगावच्या फिर्यादी अरुण गोरे यांच्या तक्रारीवरून तपास सुरू झाला. सीसीटीव्ही व वर्णनाच्या आधारे बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार जहीर अब्बास ऊर्फ मोटा व त्याचे साथीदार आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. दि. १९ सप्टेंबर रोजी देवग