कळमनूरी: विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी येडशी तांडा येथील आश्रम शाळेतील मुख्याध्यापकासह दोघे जण निलंबित
कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथे भोजाजी नाईक आश्रम शाळेच्या वस्तीगृहात विद्यार्थिनीवर विनयभंगाचा प्रकार झाल्यानंतर पालक आणि गावकऱ्यांनी रोष व्यक्त केल्यानंतर संस्था प्रशासनाने शाळेचे मुख्याध्यापकासह दोघा शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी संस्था प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे .