देऊळगाव राजा: -श्री बालाजी मंदिर येथील चारशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला श्री बालाजी महाराजांच्या जयघोषात लाटा मंडप उत्सव संपन्न
*श्री बालाजी महाराजांच्या जयघोषात लाटामंडप उत्सव संपन्न* देअळगांव राजा - दि ३० सष्टेंबर ८ वाजता -प्रतितिरुपती म्हणून ओळख असलेल्या श्री बालाजी महाराजांचा आगळा वेगळा व केवळ देऊळगाव राजा शहरात पार पडणारा लाटामंडप उत्सव श्रींच्या जयघोषात व भक्तांच्या असीम उत्साहात संपन्न झाला. मंदिरातील घंटानाद, प्रवेशद्वारावरील नगारे आणि गोविंदा गोविंदा चा उदघोष तसेच बोल बालासाहेब की जय, लक्ष्मी रमण गोविंदा या जयघोषात श्री बालाजी मंदिर परिसर दुमदुमून निघाला.