नेवासा प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहिर करण्यात आले असून पत्रकार दिनाच्या निमित्ताने या पुरस्काराचे वितरण नेवासा येथे होणार आहे.पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे शहरातील जेष्ठ पत्रकार अशोक डहाळे,वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत असलेले डॉ.निलेश लोखंडे यांना समाजभूषण व तर शिक्षण क्षेत्रातबरोबरच सामाजिक कार्य अग्रेसर असलेले जिल्हा परिषद शिक्षक विक्रम गोसावी यांना सामाजिक कार्य पुरस्कार असे पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी दिली आहे. नेवासा येथील पंचायत समिती सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा पुरस्कार वितरण कार्यक्रम गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासकर यांच्या शुभहस्ते व जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.