अचानक निर्माण झालेल्या वादळीवाऱ्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या अनेक बोटींना माघारी परतावे लागल्याने मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या उरण परिसरामध्ये एका मासेमारी बोटीला जलसमाधी मिळाली, मात्र या बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप बचावले आहेत. यंदाच्या हंगामात वादळामुळे मासेमारीत अडथळा येण्याची ही नववी वेळ आहे, ज्यामुळे मच्छिमारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.