सेलू शहरालगत असलेल्या बोर नदीत बुडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) दि. १२ ला दुपारी उघडकीस आली. मृत इसमाचे नाव रामदास वाटेकर (वय ४५, रा. कोथिवाडा सेलू) असे असून, याप्रकरणी गोविंदा आलमपुरे (रा. कोथिवाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सायंकाळी ५ वाजता मर्ग दाखल केला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून देण्यात आली.