नागपूर ग्रामीण: मोठी बातमी: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी पूर्णपणे रद्द!
बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आता शेतकऱ्यांना स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर खोदण्यासाठी, जनावरांचा गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती, गाळ आणि मुरूमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला कोणतीही रॉयल्टी (स्वामित्व धन) द्यावी लागणार नाही. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ही मोठी घोषणा केली असून, याबाबतचा शासन निर्णयही तातडीने जारी करण्यात आला आहे.