रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीत 23 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 2 वाजता एका गंभीर प्रकरणाची नोंद झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोने महिला फिर्यादी हिच्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर फिरायला घेऊन जाण्याचं बोलून, तिला आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न केला. मुलगी अल्पवयीन असल्याचंही आरोपीला माहिती होतं. घटनेनंतर आरोपी दरवाजाला कडी लावण्यासाठी गेल्यावर, पीडित मुलगी घाबरून बाहेर पळून गेली. आरोपीने मुलीला 'कोणाला काही सांगू नकोस', अशी धमकी दिली. ज्यामुळे मुलीला मानसिक त्रास आणि लज्जा उत्पन्न झाली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता आणि संताप पसरला आहे.