संग्रामपूर: बावनबीर येथे दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीवर दगड फेक प्रकरणी आणखी ३ जणांना अटक
संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गादेवी मूर्ती विसर्जन मिरवणूक प्रसंगी दगड फेक करून मिरवणुकीला व गावाला गालबोट लावण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी विविध कलमाद्वारे एकूण ३४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले त्याापैकी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले होते.७ आक्टोबर रोजी आनखी ३ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती १० आक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.