जालना: जिल्हा सामान्य रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी; सामाजिक समतेचा संदेश
Jalna, Jalna | Apr 11, 2026 जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. शनिवार दि. 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी त्यांच्या कार्याची आणि विचारांची उजळणी करत सामाजिक समतेचा संदेश दिला. या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा चिकित्सक राजेंद्र गाडेकर यांनी महात्मा फुले यांच्या शिक्षण,स्त्रीशिक्षण आधीवर प्रकाश टाकला.