अंजनगाव सुर्जी: शिवसेना शिंदे गटाची प्रभा मंगलम येथे आढावा बैठक;डॉ.स्पृहा डकरे यांचा पक्ष,नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर
अंजनगाव सुर्जी स्थानिक नगर परिषद निवडणूक अनुषंगाने आज सायं ७ वा.च्या सुमारास शिवसेना शिंदे गटाची प्रभा मंगलम येथे आढावा बैठक व पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता.या बैठकीला शिवसेना अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष मा.खा.तथा मा.केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ,निवडणूक प्रभारी माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील,जिल्हाप्रमुख सुनील पाटील डिके,शाम देशमुख यांची उपस्थिती लाभली.यादरम्यान नगराध्यक्ष पदासाठी डॉ स्पृहा डकरे व डॉ.अतुल डकरे यांनी शिवसेना पक्ष प्रवेश केला.