पातुर: शिर्ला गावात गुरांना लम्पीसदृश आजाराचा कहर; पशुवैद्यकीय विभागाचा हलगर्जीपणा पशुपालकांचा आरोप!
Patur, Akola | Nov 5, 2025 पातूर तालुक्यातील शिर्ला गावात गुरांमध्ये लम्पीसदृश अज्ञात आजाराने थैमान घातले असून अनेक जनावरे आजारी, तर काहींचा मृत्यू झाला आहे. शरीरावर गाठी, तोंड फुटणे आणि चारा-पाणी न घेण्याने गुरे अशक्त झाली आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारींनंतरही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. उमेश डहाळे, राजू कठाळे, वसतकार आदींच्या गुरांना आजाराची लागण झाली आहे. पशुपालकांनी तातडीने लसीकरण व औषधोपचार मोहीम हाती घेण्याची मागणी केली आहे.