भाजपला कमरेच्या खाली शिव्या देणारे आज मंत्री झाले आहेत,' असा घणाघाती आरोप माजी मंत्री व काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे. राजकीय सभ्यतेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. या वक्तव्यामुळे विदर्भातील राजकारणात खळबळ उडाली असून, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.