नाशिक: दसरा मेळाव्याच्या पाश्वभूमीवर मायको सर्कल येथे शिवसेनेची नियोजन बैठक पडली पार
Nashik, Nashik | Oct 1, 2025 शिवसेना दसरा मेळावा निमित्त मायको सर्कल येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..यंदाचा शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा यंदा गोरेगाव येथील नेस्को एग्झिबिशन सेंटरमध्ये सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.“यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर… स्थळ बदललंय, पण परंपरा नाही!” अशा संदेशासह हा मेळावा पार पडणार आहे.या संदर्भात नुकतीच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बैठक घेण्यात आली. त्यात ठरविण्यात आलं की, नाशिकचे प्रमुख पदाधिकारी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत