गेवराई: धनगर आरक्षणासाठी खिशात चिठ्ठी लिहून एकाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना मादळमोही येथे घडली
Georai, Beed | Oct 19, 2025 धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नसल्याने खिशात चिठ्ठी लिहून एका युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बीडमधील गेवराईतील मादळमोही येथे घडली. योगेश बबन चौरे (वय ३३) रा. मादळमोही ता. गेवराई जि. बीड असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आल्यानंतर मृत युवकाच्या खिशात एक चिठ्ठी आढळुन आली. या चिठ्ठीत त्याने धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचा मजकूर होता. यावरुन धनगर समाज संतप्त झाला होता.