पुणे शहर: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला गती; येरवड्यातील ४८ हजार चौ.मी. जमीन पीएमआरडीएला.
Pune City, Pune | Oct 18, 2025 – हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन-३ प्रकल्पाला गती देण्यासाठी येरवडा येथील ४८ हजार ६०० चौरस मीटर शासकीय जमीन कायमस्वरूपी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (PMRDA) हस्तांतरित करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही जमीन मेट्रो प्रकल्पाच्या व्यवहार्यता तफावत निधीसाठी वापरली जाणार असून सिटी सर्व्हे क्रमांक २२०१, २२१६ आण