चांदूर रेल्वे: चांदुर रेल्वे येथे काँग्रेसच्या वतीने शेतकरी धडक मोर्चा सरसकट ५०,००० रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी
खरीप हंगामातील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, ओला दुष्काळ जाहीर व्हावा आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी तालुका व शहर काँग्रेस कमिटी, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे यांच्या वतीने भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर नगरपरिषदेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यात आले..