नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे नाशिककरांनी आरोपीला फाशी द्या चिमुकलीला न्याय द्या जाहीर निषेध जाहीर निषेध अशा घोषणा देत सराफ बाजार मेन रोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हाताला काळे कपडे बांधून मोर्चा काढला होता यावेळी आमदार सीमा हिरे ह्याही या मोर्चाला उपस्थित होत्या त्यांनी आपण मुख्यमंत्र्यांकडे या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी यासंबंधी मागणी करणार असल्याची सांगितले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात येऊन आरोपीला मोठ्यात मोठी सजा द्यावी देण्यात यावी अशी मागणी केली.