कोपरगाव: शहरातील दुय्यम कारागृहातील १८ आरोपी कैद्यांची सुरक्षेच्या कारणास्तव नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी
कोपरगाव शहरात दुय्यम कारागृहात विविध गुन्ह्यात अटकेत असलेल्या तब्बल 18 आरोपी कैद्यांची सुरक्षेच्या कारणास्तव नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आज २५ मे रोजी सकाळी ११ वा.मोठ्या पोलिस बंदोबस्त रवानगी करण्यात आली आहे. यावेळी नायब तहसिलदार चंद्रशेखर कुलथे यांच्यासह दुय्यम कारागृहाचे अधिकारी, कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, राहता,लोणी, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.