जालना: शहरात चोरट्यांचा सुळसुळाट; दिवसा ढवळ्या रस्त्यावर उभा राहुन लुटण्याच्या घटनेत वाढ; एकाच दिवसी ठिकाणी घडली घटना
Jalna, Jalna | Oct 12, 2025 जालना शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून एकाच दिवसी दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा ढवळ्या रस्त्यावर उभा राहुन लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. सदरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सकलेचा नगर आणि अंबड रोडवरील नंदनवन कॉलनीजवळ ही लुटमार झाल्याची माहिती रविवार दि.12 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला घरासमोर उभी असताना दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवर येऊन तिच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेल्याची घटना घडली.