गडचिरोली: माओवाद्यांचा मोठा कट उधळला; लेकुरबोडी जंगल परिसरात पोलिसांकडून जुना स्फोटकांचा साठा जप्त
गडचिरोली पोलिसांनी एक मोठी माओवादी घातपाताची योजना उधळून लावत, कोरची तालुक्यातील लेकुरबोडी जंगल परिसरात लपवून ठेवलेला स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे माओवाद्यांच्या संभाव्य विध्वंसक कारवायांना मोठा आळा बसला आहे. जिल्ह्यात माओवाद्यांकडून सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्यासाठी विविध शस्त्रे आणि स्फोटक साहित्याचा वापर केला जातो.