साखर उद्योगातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार गाळप हंगाम २०२४-२५ साठी मध्य विभागातून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट तांत्रिक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उच्च कार्यक्षमतेची निकष पूर्ण केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला असून याची माहिती कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी २५ डिसेंबर रोजी दिली.