भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील राजीव गांधी स्मारक, माकडे नगर येथे दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध सप्त खंजरी वादक आणि राष्ट्र प्रबोधनकार सत्यपाल चिंचोलीकर उर्फ सत्यपाल महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत झालेल्या या कीर्तन सोहळ्यामध्ये सत्यपाल महाराजांनी आपल्या ओघवत्या वाणीतून आणि खंजरीच्या तालावर सामाजिक प्रबोधन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.