तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे दि. 11 जानेवारीपासून श्रीराम कथा प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, श्रीराम कथा प्रवचनाच्या समारोपिय कार्यक्रमाला आज दि. 18 जानेवारी रोज रविवारला दुपारी 2 वाजता तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी भेट दिली. याप्रसंगी श्रीराम कथा प्रवचन ऐकण्यासाठी आलेले भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.