जालना: परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत अभिमन्यू खोतकर यांच्या उमेदवारीची चर्चा जोरात
Jalna, Jalna | May 24, 2026 परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून युवा सेनेचे युवा नेते अभिमन्यू खोतकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया यांच्या तिकीटावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असून, त्यांच्या जागी युवा नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील युवा मतदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अभिमन्यू खोतकर यांच्याबाबत सकारात्मक वातावरण