हिंगोलीच्या वसमत शहरातील शांताई नगर आणि महालक्ष्मी नगर परिसरात सांडपाणी साचून तीव्र दुर्गंधीचा त्रास सुरू आहे. घाणपाणी सतत जमा होत असल्याने नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. तक्रारी करूनही उपाययोजना न झाल्यामुळे नागरिकांनी आज आंदोलन केलं आहे. प्रशासनाने तात्काळ ड्रेनेज समस्या सोडवावी, अशी त्यांची मागणी आहे.