भंडारा: भेल प्रकल्पाच्या जागेवर शेतकऱ्यांचा विजय! उद्योगाविना जमीन परत, १२ वर्षांनंतर मिळाला न्याय : आमदार डॉ. परिणय फुके
भंडारा जिल्ह्यातील ४७६ एकर जमीन भेल प्रकल्पासाठी (BHEL) २०१३ मध्ये घेऊनही १२ वर्षांत उद्योग उभा न राहिल्याने शेतकरी संतप्त झाले. रोजगार व विकासाचे आश्वासन भंग झाल्याने, शेतकऱ्यांनी जमिनीवर पुन्हा शेती सुरू केली. कंपनीने याला न्यायालयात आव्हान दिले. मात्र, न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत स्पष्ट केले की, 'उद्योग उभे होईपर्यंत शेतकरी जमिनीवर शेती करू शकतात.' यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्याला ऐतिहासिक यश मिळाले आहे.