तेल्हारा: हिवरखेड पोलीस स्टेशनला अखेर मुजोर ठेकेदारावर गुन्हा दाखल..
Telhara, Akola | Sep 16, 2025 अकोट-हिवरखेड-जळगाव राज्यमार्गावरील रखडलेल्या दोन पुलांच्या अपूर्ण कामामुळे वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. १६ सप्टेंबर रोजी अपूर्ण पुल आणि वाहून गेलेला पर्यायी भराव यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या पुलांच्या वस्तुनिष्ठ बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकाराला वारंवार धमक्या, अश्लील शिवीगाळ आणि गंभीर स्वरूपाच्या धमक्या दिल्याप्रकरणी ठेकेदार राजेश देशमुख यांच्यावर हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.