ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोपरी येथे स्वच्छता अभियान
Thane, Thane | Sep 17, 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास ठाणे येथील कोपरी परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परिसर स्वच्छ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 17 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता अभियान राबवले जाते.