साकोली तालुक्यातील परसोडी येथील नैसर्गिक आपत्ती अंतर्गत चुलबंद नदीकाठावरील पोवारटोली या वस्तीचे पुनर्वसन शिवनगर या ठिकाणी केले.परंतु12 वर्षानंतरही या वस्तीवर कोणतीही सुविधा देण्यात आली नाही.कोणतीही सीमांकन न करता जागा देण्यात आली.त्यामुळे नागरिकांना कुठल्याही सुविधा शासनाच्या मिळू शकत नाही त्यामुळे नवीन पुनर्वसन झालेल्या शिवनगर येथील नागरिकांनी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत तहसीलदारांना सोमवार दि८ डिसेंबरला दुपारी12ला निवेदन देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली आहे