नागपूर ग्रामीण: वडोदा पोलिसांची मोठी कारवाई; ६१ लाखांच्या मुद्देमालासह १०५ किलो गांजा जप्त
ग्रामीण पोलीस दलांतर्गत वडोदा पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीचा मोठा डाव उधळून लावला आहे. उमरी फाटा परिसरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी १०५.१ किलो गांजा आणि एक ट्रक, असा एकूण ६१ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.२ मे रोजी रात्री गस्त घालत असताना पोलिसांना संशयास्पद ट्रक आढळला.पोलीस येताना पाहून ट्रकचालकाने अंधाराचा फायदा घेत उडी मारून पळ काढला. ट्रकच्या झडतीमध्ये खाकी टेपने पॅक केलेली गांजाची पाकिटे हस्तगत करण्यात आली.