नागपूर शहर: खाटू श्याम बाबा जन्मोत्सव दरम्यान मंदिरासमोर फटाक्यांमुळे हंगामा
काही व्हायरल होत असलेले व्हिडिओ हाती आलेले आहेत. ज्यामध्ये आज खाटू श्याम बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त नागपूरातील त्यांच्या मंदिरात समोर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यादरम्यान रात्री बारा वाजल्यानंतर भव्य फटाका शोही करण्यात आला होता. या फटाका शोमध्ये काही फटाक्याच्या ठिणग्या उडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान भक्तांनी गोंधळ घातल्यामुळे त्यांना काही वेळासाठी बाजूला देखील करण्यात आले.