औंढा नागनाथ: हिवरा जाटू येथील नदीत अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ; औंढा नागनाथ पोलीस घटनास्थळी दाखल
औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथून वाहणाऱ्या नदीत दिनांक १७ सप्टेंबर बुधवार रोजी दहा वाजे दरम्यान अंगावर कपडे नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस, जमादार रविकांत हरकळ, किशोर पारीसकर,अमोल चव्हाण यांनी तात्काळ धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणला पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली मृतदेह पुरात वाहून आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला