नागपूर शहर: मद्यधुंद वाहन चालकाचा धुमाकूळ, वाहनांना धडक देत कार इलेक्ट्रिक खांबाला ठोकली, घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल
बोरगाव चौकाजवळ एका दारुड्या कारचालकाने १४ सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास मोठा धुमाकूळ घातला.दारुच्या नशेत असलेल्या या चालकाने आपल्या टाटा पंच ईव्हीने एका कुत्र्याच्या पिल्लाला चिरडले. त्यानंतर त्याने अनेक वाहनांना धडक दिली आणि शेवटी एका डिव्हायडरवरील इलेक्ट्रिक खांबवर आदळून गाडी थांबली दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवत असताना चालकाचा कार वरील ताबा सुटला. त्यामुळे ही कार डिव्हायडरवर आदळली.