5 जानेवारीला रात्री 7 वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार खापरखेडा आणि यशोधरानगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील तपासासाठी आरोपींना खापरखेडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी दिली आहे.