भंडारा: एआयएसएफ ला नक्षलवादी संघटना म्हणणाऱ्या भंडारा जिल्हा पोलीस अँटी नक्षलस्कॉडच्या निषेधार्थ त्रिमुर्ती चौकात निदर्शने
भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या नक्षलवादविरोधी पथकाने ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेत काम करणाऱ्या एका विद्यार्थिनीला नक्षलवादी संबोधल्याच्या निषेधार्थ भंडारा येथील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी एआयएसएफने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत ए आय एस एफ भंडारा जिल्हा कौन्सिलच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते २ वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.