आटपाडी: तहसील कार्यालयावर शेकडो शेतकरी एकवटले
Atpadi, Sangli | Sep 15, 2025 आज सोमवार 15 सप्टेंबर 2025रोजी शेतकरी सेनेच्या वतीने भक्तराज ठिगळे यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तहसील कार्यालया वरती भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी विटा ते माडगूळ हा पूर्वी नऊ मीटरचा रस्ता असून आता पंधरा मीटर रुंदीचे काम चालू असून रस्त्याच्या लगतच्या शेतकऱ्यांची जमीन शासनाने विना मोबदला घेतली असून या जमिनीचा मोबदला 22 सप्टेंबर 2025 पूर्वी शेतकऱ्यांना द्यावा अन्यथा शेतकरी सेनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.