हदगाव तालुक्यातील मौ.मनाठा जाणारे रोडवर शिवारात दि 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास यातील आरोपी सुहास शिंदे, मारोतराव शिंदे,संदीप शिंदे,विठ्ठल सावते,प्रशांत सावते यांनी फिर्यादीस न्यायप्रविष्ठ प्रकरणाचे कारणावरून रोडवर ट्रॅक्टर आडवे लावून लोखंडी रोडने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी करून खून करण्याचा प्रयत्न केला आणि जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी निलेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे