वरोरा: वरोरा तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी ; शेती विकासासाठी सूचना
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा जी. सी. यांनी आज दि 5 डिसेंबर ला 12 वाजता वरोरा तालुक्यात विविध कार्यांचा आढावा घेत क्षेत्रदौरा केला. सुरवातीला त्यांनी वरोरा येथील मतमोजणीसाठी ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि ईव्हीएम सुरक्षेसंदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे शेगाव बुद्रुक येथील झुडपी जंगल गट क्रमांक 1 ची पाहणी केली.