जालना: जालना महानगरपालिकेच्या सभेत सत्ताधाऱ्यांचा गोंधळ; नागरिकांचे प्रश्न पुन्हा धुळीत!..
Jalna, Jalna | Apr 6, 2026 जालना महानगरपालिकेच्या सभेत सत्ताधाऱ्यांचा गोंधळ; नागरिकांचे प्रश्न पुन्हा धुळीत!.. आज दिनांक 6 सोमवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज अक्षरशः राजकीय रणधुमाळी पाहायला मिळाली. नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची सरबत्ती करत सभागृहाला राजकीय आखाड्यातच रूपांतरित केले. शिवसेनेचे नगरसेवक कमलेश खरे आणि भाजपाचे नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांच्यातील वाद इतका टोकाला गेला की दोघांमध्य