चंद्रपूर: चंद्रपुरातील ‘ओव्हर बर्डन’वरील रॉयल्टी माफ करण्याची खा. धानोरकर यांची मागणी
जिल्ह्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे असलेले पांदण रस्ते दुरुस्त करण्यासाठी, कोळसा खाणींमधून निघणाऱ्या ‘ओव्हर बर्डन’ (माती आणि दगड) वरील रॉयल्टी माफ करून ते विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. आज दि 20 सप्टेंबर ला 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या भेटीत त्यांनी या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एक पत्र दिले.