जालना: एनआरजी शोरूम मालकाची ग्राहकाला मारहाण; इलेक्ट्रीक दुचाकीच्या दुरुस्तिवरुन वाद
Jalna, Jalna | Oct 10, 2025 इलेक्ट्रिक दुचाकीचे उत्पादन करणाऱ्या एनआरजी शोरूम मालकाने तिथे आलेल्या एका ग्राहकास धक्काबुक्की करत शोरूमच्या बाहेर काढल्याची घटना जालन्यात घडली. या प्रकरणात ग्राहकाने दिलेल्या तक्रारीनुसार शोरूम मालक रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात अदखलपात्र पुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. जालना शहरातील रहिवासी असलेले गजानन विघ्ने यांनी एनआरजी शोरूम येथून इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केली आहे.